माणसे

Started by केदार मेहेंदळे, February 17, 2014, 11:02:37 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 माझा मित्र गोविंद याच्या गझले वरून लिहिलेली ही गझल (त्याच्या पूर्व परवानगीने)

घरोघरी माणसे मिळाली
परोपरी माणसे मिळाली

वारकरी लोकांच्यात मला
कामकरी माणसे मिळाली

काट्या सारखा सललो तरी
फुलांपरी माणसे मिळाली

मुखवटयांच्या जगात सुध्धा
खरीखरी माणसे मिळाली

लग्न करून सोयरिक जुळली
त्याच घरी माणसे मिळाली

छळले जरी मला काहींनी
तशी बरी माणसं मिळाली

मेला तो एकटाच होता
बघा तरी माणसे मिळाली

शेवट तो एकटाच गेला
किती जरी माणसे मिळाली


केदार...

vijaya kelkar

     व्वा ,छान ...
''चुपचाप बसावे वाटले कधी
हसरी -बोलकी माणसे मिळाली ''

dipak chandane

nice yar pan .............................

मिलिंद कुंभारे

काट्या सारखा सललो तरी
फुलांपरी माणसे मिळाली

मुखवटयांच्या जगात सुध्धा
खरीखरी माणसे मिळाली....

फारच भाग्यवान आहेस....... केदार दा...... :)

sweetsunita66


छान केदार !!!

भावना मुखवट्या आड लपवून
वावरणारी माणसे मिळालीत
नयनी सरिता वाहतांना
हसू फुलविणारी माणसे मिळालीत ...

nandan nangare

changli kavita sakaratmk ahe.

nandan nangare

chan sakaratmk kavita aahe