आतातरी ये ना !!

Started by sumitchavan27, September 03, 2009, 09:07:58 PM

Previous topic - Next topic

sumitchavan27

ये ना सख्या
किती बोलावू?
किती आळवू?
आतातरी ये ना !!!

रस्त्यातून जाताना
समोर बकुळफुल
पुन्हा आभास तुझा
जीवलगा, आतातरी ये ना !!

वा-याची झुळूक
अंगावर मोरपीस
गहिवरला स्पर्श तुझा
प्रियतमा, आतातरी ये ना !!

रफिचे सूर
"तुम जो मिल गये हो!!!"
पुन्हा तीच आठवण
लाडक्या, आतातरी ये ना !!
.
.
.
.
.
.
तुझ्या विरहात
व्याकुळ जीव
राजसा मेघराजा
आतातरी ये ना !!