देवा इतकंच दे! (एक विडंबन)

Started by केदार मेहेंदळे, February 19, 2014, 12:04:16 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 मात्रा : १४+१३

त्याला पूर्ण बाटली दे, मला माझी चपटी दे
नशीब नाही दिलं तरी, एक रिती धोपटी दे

काळी गोरी बुटकी दे, जाड अथवा लुकडी दे   
नाकावर राग नसावा, बायको मज नकटी दे 

पोळी भाजी नको मला, केवळ प्रेमळ साथ दे
भात खाइन नुसताच मी, पाण्याची आमटी दे 

भाज्या डाळी महागले , चूल कधीची बंद रे
भिक मागायला सरकार, बस एक करवंटी दे

चहा पितो टपरीवर मी, ही माझी अवकात रे
शान मारायला खोटी, मिटिंगमधे ग्रीन टि दे   

संसारात रमलोय मी, वेळ नाही भजनाला
नाम घेईन देवा मी, बस थोड्या कटकटी दे


केदार...

शिवाजी सांगळे

केदार, छानच....

माझ्याही दोन ओळी....

मत स्वत:चे मांडतो, विचारांना बळ दे,
हे माय मराठी सेवेसाठी, शब्दांना शक्ती दे!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

vijaya kelkar

संसारात रमलोय मी, वेळ नाही भजनाला
नाम घेईन देवा मी, बस थोड्या कटकटी दे

        बरोबर आहे ....
''दु:ख,दैन्य सांडले , झोळी फाटली रे
ते पुन: बांधायला एक वळकटी दे ''  ....ह्या माझ्या ओळी

केदार मेहेंदळे


जया

काळी गोरी बुटकी दे, जाड अथवा लुकडी दे   
नाकावर राग नसावा, बायको मज नकटी दे

----------------------------------------------------

देव म्हणे, "झालोय्‌ , वत्सा, प्रसन्न तुजवर
देतो, हं, बायको मी तुला अगदी लवकर
काळी, बुटकी, लुकडी, आणि असेल ती नकटी
तुला पाहिजे तशीच ती पण नसेल फटाकडी."