कशी विसरू ग तुझी माझी प्रीत!!

Started by श्री. प्रकाश साळवी, February 19, 2014, 01:05:24 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

कशी विसरू ग तुझी माझी प्रीत
कसे विसरू आपले प्रेमगीत
विसरलीस तू जरी, नाही विसरलो मी तुला,
शब्दात बांधून ठेविले मी तुला
हसतेस जरी तू तिथे मी मात्र वेडा इथे,
किती आठवणी, आणि मन माझे तिथे,
हृदयावर ठेवून धोंडा गेलीस तू निघून,
पाहून घायाळ मी, गेलीस तू इथून,
विसरणे सोपे नसते ग "खरी प्रीत"
विश्वास नाही मला, "माधुरी" हीच का तुझी रीत,
पाहीन वाट तुझी या जन्मी जरी ना भेटली तू
अनंत जन्म घेईन मी तुज साठी, भेटू आपण मी आणि तु.
*****-> स्वरचित प्रकाश साळवी