प्रेम फजिती

Started by विक्रांत, February 20, 2014, 08:48:36 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


मी तिच्या बॅगेत एकदा हळूच फुल ठेवले
पण तिने हसून राजूलाच थॅन्क्स म्हटले
मी तिच्याशी रस्त्यात बोलण्याचा यत्न केला
सरातर्फे तिने माझा पार बाजा वाजवला   
मी तिला पाहण्यास तीन मैल चालून गेलो
कुत्रांच्या तावडीतून जीव वाचवून आलो
ठोकर खावून रस्तात खाड्यात पडून पडलो 
पळपुटा सैनिक होत महायुद्ध हरून आलो
वर्गात तिला सतत पाहतसे डोळा भरून
भाऊ तिचा म्हणाला टाकीन डोळे फोडून
नाद खुळा माझा तरीही कमी नाही झाला
तक्रार येता घरी मग बापाने कचरा केला
शाळेमध्ये जावून हेच धंदे करतोस काय
शिव्यालाथाबुक्के नका विचारू झाले काय


विक्रांत प्रभाकर


मिलिंद कुंभारे


Çhèx Thakare

हा हा मस्तच ह .. खुप छान

विक्रांत

तुम्ही दोघे च प्रतिक्रिये मध्ये असणार असे वाटत होते .आणि आहात .thanks