मी प्रवाही...

Started by शिवाजी सांगळे, February 21, 2014, 09:10:10 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नाहीत मजला पाश कसले
अवखळ, चंचल मी प्रवाही,
साथ मजला कातळ काळी
प्रेम तुषार उधळीत जाई !

डोलत तारू, हलकेच तरुण
ओलसर नयनी पहात राही,
रेशीम पांढरी लेवून वस्त्रे
मिळण्या सागरास झेप घेई !!


©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९