|| दुत ... ||

Started by Çhèx Thakare, February 22, 2014, 12:38:35 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

|| दुत ... ||
.
.
मी वैर कावरा, 
वारा बावरा
सप सप कापल्या,
धारा कोवळ्या
धावून मी त्या,
काळ्या खडकांवरती
ऊलटून काढल्या,
त्या सांज कोवळ्या
.
टाकीत टापा,
टपटप टकटक
ह्रदयी वाजे,
धडधड धडधड
तरीही न थकता,
मागे न बघता
जिवनाशी माझी,
अशी ही धडपड
.
रांगडे शरीरास,
घामाचे श्रवण
शुभ्र डोळ्यांमधे,
लाल ते लवण
श्वासांच्या या,
जुगलबंदी मधे
धावत माझे,
रांगडे यौवन
.
पाठीवरती,
शिदोरी माझी
जगण्यासाठीची ती
दोरी माझी
घेवून विसावा,
खाऊन भाकर
पुन्हा धावण्याची,
तयारी माझी
.
खलिता माझ्या,
हातामधे,
राजाची भक्ती,
रक्तामधे
रंगाने ओळख,
काळा-सावळा
धावत आहे हा,
छञपतींचा मावळा
.
.
©  चेतन ठाकरे 
21-2-2014