दुखी मना …

Started by saili, February 22, 2014, 11:15:25 PM

Previous topic - Next topic

saili

दुखी मना ...

दुखी मना सांग तुला कसं खुश करू
कसं तुला त्या बालपणाच्या सुखी
आठवणीत घेयुन जाऊ ...

कसं तुला त्या छोटया छोट्या आनंदात
होणाऱ्या निष्पाप मनाकडे घेयुन जाऊ ....
ते आईचे गोजारणे ... ते बाबांचे कौतुक करण
त्या आजीची माया ... ती भावंडांची मस्ती
तो काळ ती वेळ... सगळं मनाला
हुर हुर लावणाऱ्या आठवणी ...कस आणुन देऊ...

धकाधकीच्या ह्या जीवनात स्वताला सिद्ध करण्याच्या
ह्या शरियेतेत ... लुप्त झालंय तो काळ ती वेळ
तरीही मन वळतेय जुन्या आठवणींकडे त्या
गेलेल्या काळाकडे....

आणुया तो काळ ती वेळ परत ....
जिथे माणसाना किमत असेल ... पैश्याला नाही
प्रेमाला कीमत असेल ... रुद्ब्याला नाही
जिथे स्वच्छ हवा .... फुलांचा सुगंध मनाला आनंद देईल ...

सांग मना कसा तो काळ ती वेळ आणु
कस खुश करू तुला ????

सायली

please share your views on my poem...