राज्य वाढले की

Started by विक्रांत, February 23, 2014, 01:39:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

राज्य वाढले की राजे वाढतात
मंत्री वाढतात संत्री वाढतात
एक सिंहासन पिढ्यान पिढ्याचे
काही घराणी सुरु होतात
जुन्या राजाचे चमचे पळतात
पित्ते हरवतात खंडणी घालवतात
एक भाकर सुवर्ण लखलखीत
चटकन अर्धी करून टाकतात
चार वेसकर सरदार होतात
दहा लॉटऱ्या नव्या लागतात
पण लोकांचे काय होते
पत्यावरचे राज्य बदलते
चार दिवस ते खुळ्यागत
गुलाल झेंडे मिरवत राहतात
नंतर मात्र तोच बाजार
तोच माल तीच येरझार
तेच शेत तीच बियाणं
नांगर शेत तेच खुरपण
तीच नोकरी पोटापुरती
रात्र काढणे बाजेवरती
**** **** **** **
वाढोत राज्य तुकडे पडोत
घर कुणाचे वाडे भरोत
पण माणसास या इथे
दोनवेळचा घास मिळू देत

विक्रांत प्रभाकर