* का असा ग मी आहे ...*

Started by amolbarve, February 25, 2014, 10:56:44 AM

Previous topic - Next topic

amolbarve

*माझी कविता *
* का असा ग मी आहे ...*

का असा ग मी आहे,
मला समजेना काही
माझ्या मनी हि तुला,
मी चोरून ग पाही

तुझ्याशी अबोला ग,
माझ्या जीवाला खाई
पावसाच्या वेधाने मोर,
ढगाकडे पाही

माझ्या ह्या प्रीतीला,
काही मोल आहे का ग नाही
भरलय ग मन,
कधी कोसळेल काही भरवसा नाही

दिसामागुन दिस आता,
सरत ग जाई
आता तरी तू सांग,
तू परताशील कि नाही ....
-अमोल बर्वे .
Like · · Promote · Share