** आयुष्याचा पेपर ** { पेपर मधील बातमी वरून }

Started by SANJAY M NIKUMBH, February 25, 2014, 06:05:24 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

** आयुष्याचा पेपर **  { पेपर मधील बातमी वरून }
===============
सातवीचा निकाल घेण्यास जातांना
बापानं म्हटलं
नापास झाला तरी कुठे जाऊ नकोस
सरळ दुकानावर ये
परीक्षा काय बेटा पुन्हा देता येते
आज कळला मला त्या बोलण्याचा अर्थ
निकालापूर्वीच मुलानं कठीण पेपर गेला म्हणून
आत्महत्या केल्यानं ......

फक्त पेपर कठीण गेला किंवा
नापास होणार या भीतीनं
आयुष्याचाच निकाल लावून टाकायचा
हे दुबळ्या मनाचचं लक्षण झालं ...

पण याला तोच कारणीभूत होता कां
मित्र , शिक्षक , पालक , समाज
हि जबाबदारी झटकू शकतां कां
कां नाही समजावलं कुणी आयुष्याचा पेपर
"अपयश हि सुद्धा यशाची पायरी "
असं सांगितलं नसेल कां त्याला कुणीच ....

अभिमान वाटतो मला माझ्या बापाचा
त्यानं मला आयुष्याचा पेपर समजावलां
परीक्षेचा पेपर पुन्हा देता येतो हे सांगितलं
कदाचीत बापाच्याही मनात हीच भीती असेल तेव्हा
म्हणून त्यानं सांगितलं तसं मला पोटतिडकीनं
==============================
संजय एम निकुंभ , वसई
दि . २५.२.१४  वेळ : १० . ३० {ठाणे बसमध्ये }