बाळ

Started by varshauday, February 27, 2014, 11:51:22 PM

Previous topic - Next topic

varshauday

       बाळ
न्यारी असते गोष्ट बाळाची
आवडती तुम्हा आम्हा सर्वाची
घरी अवतरता बाळ लाघवी
वाटे जणू आली नवी पालवी .
        साक्षात्कार म्हणू की किमया देवाची
        मनोकामना पूर्ण होई कुटूम्बिय़ाची
        पटापट प्रमोशन सगळ्याना देउन
        बाळ राज्य करी बॉस बनून
मूड होई तेवा रडू सुरु करी
आई पासून सर्वांची परीक्षा ते पाही
कधी हवी आजी ,तर कधी आजोबा
घरात सर्वांचा हा लाडोबा
        ताई होते आत्या ,तर छोटा काका
        सकाळ संध्यकाळ कौतुक नुसते ऐका
        बाळाची उशी आईची कुशी
        गाय वासरुची जोडी जशी
तेल-मालिश करते आजी ,प्रेमाने
न्हाऊ -न्हाऊ घालते दूध- बेसनाने
पावडर-तीटी गुटी आणि दुदु
होता होता बाळाची गागा होई सुरु
     गलोत झबले मउ मउ घालून
     झोपी जाई  झोळीत दुपटे गुंढाळून
     रात्रभर जागवी घरी शेजारी
     लबाड बाळ कसे हसे पहा तरी
पंचप्राण आईचा गळ्याचा ताईत
आंधळ्या प्रेमाची रीत आणली जगात
लंगोट-झबल्यांच्या पताका घरी
जोन्सन बेबी पावडरचा वास दरवळी
   उद्योग नाही दुसरा सू- शी शिवाय काहीच
   खोटे रडून पटकवी मांडी ,आईचीच
   अंगाई ऐकत झोप आली बाळाला
   दृष्ट काढून ,कृतकृत्य वाटे मायेला.


   सौ. वर्षा महाजन.
Mrs Varsha Uday Mahajan
Rourkela Odisha