*** निवडक गझल ***

Started by श्री. प्रकाश साळवी, March 01, 2014, 05:23:53 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तव प्रेमाश्रू ओघळतील जरी माझ्या डोळ्यातून,
जवळ-पास असता तू, चुंबिले असते मी माझ्या ओठातून !!
*** १
माझीच छबी नाही ना
लपली माझ्याच मनात,
कुठला मुखडा लपला आहे,
मग माझ्याच हृदयात?
** २
कोमल मन आहे तुझे,
हे क्षितीज तर खचितच नाही!
हि पृथ्वी नाही, हे तर तुझे संकोचित मन
माझ्याच घरात नाही ना बरसणार
असा लपला आहे का "सावन"?
** ३
हे सुंदरी कोणाची कोण तू ,
कुण्या भाग्यवंताची "सुता" कि धन्वानाची तू,
सूर्याच्या या उदयाला, दिससी उदास का तू?
का विन्मुख झालीस तू या या जीवनाला,
कि काही जखमा आहेत तुझ्या दिलाला!
का कोणाची पाहतेस वाट तू इथे?
का आलीस तू या वनी "रुपवते"?
** ४
प्रेमाची साक्षात ज्योत तू,
माझ्या मनीच्या दिव्यात,
अनंत युगे अशीच राहशील,
जसे मोती शिंपल्यात,
** ५
अनुत्तरीत मी कधीच नव्हतो,
परिस्थितीने मला घायाळ केले,
साथ जी तुझी लाभली,
हे माझे सौभाग्य भले,
अर्पितो मी हे प्रेमपुष्प तुला,
तू माझ्या मनी वसावी,
मी असलो नसलो तरी तुला,
बस, आठव माझी असावी,
** ६
स्वरचित : प्रकाश साळवी
[/b]