पाऊस

Started by ap01827, March 01, 2014, 05:53:15 PM

Previous topic - Next topic

ap01827

सखी तुला पाहिलं
पावसात
चिबं चिबं भिजताना
तू थुई थुई
नाचत होती
त्या मोरासारखी
पिसारा फुलवून
पिंगा घालत
अवतीभवती
आणि मी समजलो
मला झाला
आज फार उशीर
माझ्या आधी
लवकर आला होता
जुना प्रियकर पाऊस
बनून तुझा
सखा सोबती

         संदीप लक्ष्मण नाईक