सुखापेक्षा जास्त दुःखच गोड वाटतं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 03, 2014, 08:07:34 PM

Previous topic - Next topic
हल्ली कळत नाही मला,
नेहमी असं का बरं होतं.....

तिच्या मिठीत विसावलो की,
मन जग सारं विसरुन जातं.....

पुन्हा पुन्हा तिच्या स्पर्शला,
क्षणोक्षणी तरसत राहतं.....

ती नजरे समोर येताच,
तिलाच एकटक सारखं पाहतं.....

गुंतून जातं पुर्णपणे तिच्यात,
तिच्यासाठीच वेडं होऊन फिरतं.....

प्रेमाची ही दुनियाच न्यारी,
सुखापेक्षा जास्त दुःखच गोड वाटतं.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०३-०३-२०१४...
सांयकाळी ०७,५७...
©सुरेश सोनावणे.....