जीव माझा जातोय।

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 03, 2014, 10:02:02 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ये कुशीत ये
तुला पंखाखाली घेतो
मायेची उब माझ्या
हवीतेवढी देतो
सगळ दुख विसरु
आणि एकत्र येउ
जगाला विसरून आपण
एकरूप होउ
मलाही आवडेल
तुझ्या कुशीत यायला
सर्व जगाला विसरून
मिठीत विसावायला
बाहेरच्या जगाशी
संबंधच तोड़ू
फ़क्त तू आणि मी
असच नात जोडू
ये लवकर ये
वाट मी पाहतोय
तुझ्या आठवणीत आता
जीव माझा जातोय
जीव माझा जातोय...

अंकुश नवघरे...©
03/03/2014.