हे कशासाठी???

Started by pomadon, September 07, 2009, 06:50:14 PM

Previous topic - Next topic

pomadon

            हे कशासाठी
   1)लग्नात मान्ड्व कशासाठी???  
   = मातेनं माझ्या मुलीचं मनही मान्ड्वासारखचं मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!


   2)विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???  
   = माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!


   3)नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???  
   = माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!


   4)मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???  
   = मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!


   5)लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???  
   = प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या-माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे सांगण्यासाठी !!!


   6)लग्नात सप्तपदी घालावी,हे कशासाठी???  
   = तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे सांगण्यासाठी !!!


   7)लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???  
   = तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे,हे सांगण्यासाठी !!!

santoshi.world


gaurig