चिंब पाऊस

Started by shan, March 06, 2014, 09:46:18 AM

Previous topic - Next topic

shan

चिंब पाऊस

क्षितिजावरून दिसतात जश्या विजेच्या तारा
फर फर मुसंडी मारत आला जसा वारा
धो धो आवजात आल्या जश्या पाण्याचा धारा
शांत केला ताप जसा भुईचा सारा
चिंब पाऊस आला , चिंब पाऊस आला !

पाण्यासोबत आल्या जश्या शुभ्र गारा
पृथ्वीच्या अंगालाही झोंबतो त्याचा मारा
थंड वातवरण झाले निवळला पारा
सगळीकडे चोहीकडे एकाच नारा
चिंब पाऊस आला , चिंब पाऊस आला !

© शांताराम