रंग आणि चव

Started by aap, March 08, 2014, 12:17:54 PM

Previous topic - Next topic

aap

रंग आणि चव

मीठ ,मिरची ,मसाला
जमले सगळे सभेला
मीठ म्हणाले रंग माझा पांढरा चव माझी खारट
मिरची म्हणाली रंग माझा हिरवा ,लाल चव माझी तिखट
लिंबू म्हणाले रंग माझा पिवळा चव माझी आंबट
साखर म्हणाली रंग माझा पांढरा चव माझी गोड
मेथी म्हणाली रंग माझा पिवळा चव माझी कडू
लागले आपापसांत भांडायला
जो तो म्हणतो माझीच चव छान
बाप्पा आला भांडण मिटवायला
खारट ,तिखट ,आंबट ,कडू ,गोड चविशिवाय
नाही पदार्थाला शान
                               सौ . अनिता फणसळकर