माझा मित्र गोविंद

Started by केदार मेहेंदळे, March 13, 2014, 12:01:07 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

माझा मित्र गोविंद याच्या साठी लिहिलेली ही कविता. (ही गझल नाही, गझल format मधे लिहिलेली कविता आहे)

जिथे जिथे गझल तिथे दिसतो गोविंदा
शब्द आणि कला तिथे रमतो गोविंदा

चित्र त्याची भाकरी, श्वास त्याचे गझल
मतल्या साठी जमीन कसतो गोविंदा

कधी वाघ कधी बुध्द, कधी भित्तीचित्र
जीवनात रंग नवे भरतो गोविंदा

''येता मी वारीला येशील परतुनी''
विठ्ठलास हामी बघ पुसतो गोविंदा

शब्द याचे श्वास हा लांबचा प्रवासी
पुढपुढे गझल मागे पळतो गोविंदा

''सोड रस्ता वाघा'' केदार सांगतो
घेवून शेर खिशात फिरतो गोविंदा


केदार...



Shital dolly