प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

Started by Suhas Phanse, September 09, 2009, 04:18:02 PM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

संत तुकडोजी महाराजांचे 'मंगलमय नाव तुझे सतत गाऊ दे' हे भजन गात असतांना हे गीत (राष्ट्रीय भजन) जन्माला आले. चाल माहिती असेल तर चांगलेच आहे; नसेल तर चाल लावायचा प्रयत्न करा. आणि हो! या माझ्या निर्मितीवर फक्त देवनागरीमध्ये मत प्रदर्शन करण्याची परवानगी आहे. रोमन लिपीतल्या मतांची दखल घेण्यात येणार नाही. baraha.com डाऊन लोड करून ठेवा म्हणजे केव्हांही देवनागरीमध्ये लिहिता येते. रोमन लिपि मध्ये इनपुट दिले कि देवनागरीमध्ये आऊटपुट मिळते.


प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे ॥धृ॥

युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी ।
जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे ॥१॥

अनुशासन रक्तातुनी, हिम्मत बलदंडातुनी ।
चैतन्या श्वासातुनी, सतत वाहू दे ॥२॥

सामाजिक भान आणि, बंधुभाव मनी रुजवुनी ।
सत्त्याची कास धरुनी, स्थैर्य येऊ दे ॥३॥

सुहास फणसे