तुझं हसणं मला खुप आवडतं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 17, 2014, 07:03:22 PM

Previous topic - Next topic
तुझं हसणं मला खुप आवडतं...!!

तुला हसताना पाहून,
मलाही हसावसं वाटतं.....

तुझ्या मधाळ हसण्याला,
डोळेभरुन पहावसं वाटतं.....

हसणचं तुझं असं गोड,
त्यात मिश्रीत व्हावसं वाटतं.....

तुझं ते लाजून हसणं,
मनाला माझ्या वेड लावतं.....

तू अशीच हसत रहा,
असं सांगावसं वाटतं.....

तुझ्या हसण्यानेच मला,
तुझ्यासाठी जगावसं वाटतं.....

तू हसतेस इतकी छान,
तुझ्यात गुंतावसं वाटतं.....

खरं सांगायच झालच तर,
तुझं हसणं मला खुप आवडतं.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १७-०३-२०१४...
सांयकाळी ०६,२९...
©सुरेश सोनावणे.....