पाऊस

Started by ap01827, March 17, 2014, 09:24:20 PM

Previous topic - Next topic

ap01827

हा पाऊस
कधी आल्यावर
मी खूप गडबडतो
तुला देवाशपथ
खरं सांगू का ?
पावसाला सर्वात
सुंदर म्हणू की
सखी तुला
माझे मलाच
कळत नाही
पण माझ्यामते
ही दोन्ही सुद्धा
निसर्गाची रूपे
एक तो पाऊस
मनसोक़्त पडतो
श्रावणात
आणि एक ती
चिबं चिबं भिजते
अंगणात

संदीप लक्ष्मण नाईक