मृत्युंजय - शिवाजी सावंत

Started by marathi, January 24, 2009, 12:44:41 PM

Previous topic - Next topic

Yogesh143

Hi all,
Hats off to Shivaji Sawant sir,
Novel is really very awesome but the things KARNA has bared in his life its really very hurting, He deserved for everything but he didnt get it.



Pranita Mhatre

pls hi kadambari online vachayachi link sanga pls.
Karan vachanyachi khup icha aahe pan hi kadambari kuthehi milat nahiy.
so pls online vachanyasathi link sanga.

Abhijit R. Deshmukh.

Please krupa karun mla koni sangal ka, ki me kadambari marathitun online kothe vachu shakto... mala rply kara. :'(

Anan.mhatre

मृत्यूंजय ! मृत्यूंजय ! आणि फक्त मृत्यूंजय !
खूप दिवसापासून मृत्युंजय बद्दल बऱ्याच मित्रांकडून ऐकायला मिळाल होत. त्यामुळे नकळतच ह्या पुस्तकाबद्दल एक वेगळा आकर्षण तर होतंच पण कधी तसा पुस्तक हाती लागण्याचा योग कधी येत नव्हता , कदाचित पुस्तक वाचण्याबद्दलचा कंटाळा त्या गोष्टीकडे झुकवत नव्हता . जे काही वाचायचं ते इंटरनेट माध्यमातून वाचत होतो त्यामुळे कधी पुढाकार हि घेत नव्हतो . अश्यावेळी अचानक हे पुस्तक माझ्या घरी २ महिन्यापूर्वी स्वताहून चालून आलं होत . पण दुर्भाग्य असं होत कि त्यातच परीक्षेमुळे मी त्या स्पर्शही करू शकत नव्हतो. डोक्यात खंत होती परीक्षा संपेपर्यंत हे पुस्तक माझ्या रूमवर राहण्याची; कारण हे पुस्तक माझ्या मित्रांनी मिळून घेतलं होत व ते पाळ्या-पाळ्यांनी वाचत होते आणि त्या ग्रुप मध्ये माझा सहभाग नव्हता .
पण दैवाने ते माझ्यासाठी आणून ठेवलं होत असं मला वाटत .
कालच आठवड्याभरापूर्वी वाचायला घेतलेली "मृत्युंजय" हि कादंबरी कालच पूर्ण केली .
"मृत्युंजय "शब्द ओठावर आला की "कर्ण "!!
"कर्ण " शब्द आला कि "वसु " !!

"वसु "नाही?..... "सूतपुत्र कर्ण" !!

"सूतपुत्र कर्ण" नाही ?......."अंगराज कर्ण" !!

नाही ?....."सूर्यभक्त कर्ण " !!

नाही ?....."वीर धनुर्धर कर्ण "!!

नाही ?....."दिग्विजय कर्ण "!, "सूर्यपुत्र "!, "राधेय"! , कौतेय! .....नाही " दानवीर कर्ण " !!!!

कोण होता तो ?

मित्रांनो , तुम्हाला खर सांगायचं झाल तर कोणत्या शब्दात तुमच्या पुढे सांगू खरचं प्रश्नचिन्ह आहे ....
कादंबरी संपता संपता काळ रात्री ३ कसे वाजले होते मला समजलंच नाही..
अंगावर रोमांच्याचे शहारे झळकत होते ...नकळत अंग थरथरत होत ....
पुस्तक संपता संपता नकळत दोन्ही डोळ्यात अश्रू कधी डबडबले समजलं हि नाही ...
साक्षात श्रीकृष्णाच्या मुखातून त्या महावीराचा महानिर्वाणाचे दृश्य मी समोर प्रत्यक्षात अनुभवत होतो....
अगदी मारणाच्या दारात आपली दानशूरता अक्षय ठेवणारा, परम मधुसुदानाच्या डोळ्यात पाणी आणणारा, मैत्रीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा , एका जन्मदात्या मातेला दिलेल्या वाचनासाठी प्रतीस्पर्धी युधिष्टर , भीम , नकुल आणि सहदेव ह्यांना रानागणात जीवनदान देणारा, रथ दलदलीत फसणार ह्या शापाने शापित असताना आपल्या सारथी शाल्ल्याला हसत हसत दलदलीत टाकण्याचा आदेश देणारा , अगदी शेवटच्या घटकांमधे अर्जुनाला संभ्रमित करणाऱ्या कृष्णाच्या कडे हसून कटाक्ष देवून प्रणाम करणारा ,,,,,, कोण होता तो ?
तो फक्त एकाच मृत्यूला कुरवाळून अमर ठरलेला एक "मृत्युंजय कर्ण ".......

खरच ! कै . शिवाजी सावंत ह्याचं कोणत्या शब्दात मी आभार मानु मला खरच कळत नाही ... त्यांच्या शिवाय हा असा कर्ण कधीच माझ्या समोर उभा ठाकला नसता .....खर तर महाभारतील त्यांच्या प्रत्येक पत्रान मला भारावून टाकलय ...पण सर्वात श्रेष तो एकच , अगदी श्रीकृष्णाहून हि श्रेष्ठ असा तो "कर्ण ".........
आनन म्हात्रे ....

Sam shinde

खुपच अप्रतीम अशी कांदबरी...वाचताना पार डुबून जातो

Sylvie

मृ त्युन्जय नाव पण किती सार्थक आहे, मला कर्णाचे चरित्र वाचताना त्याच्या मनाचे कंगोरे वाचायला मिळाले, मला माहित नाही किती खरे आहेत.
खूप प्रश्न पण पडतात?
अस्वत्थामा सारखा माणूस ज्याचे विचार एवढे चांगले असतात तो महाभारतात असा वागू शकतो ?
मग कर्ण का नाही पांडवांच्या बाजून आला ?
मग खूप वेगळा झाला असत

Shona1109

mi ajun मृत्युंजय - शिवाजी सावंत" he pustak vachal nahi pan Anan tuzhya anubhavanantar mala te kadhi vachte as zhalay

kharach khup interesting vatatay....mi nakkich vachnar ......मृत्युंजय"


Çhèx Thakare

#18
"मृत्यंजय" खरं तर नावातच खूप वजन आहे , या कांदबरी बद्दल खूप कुतूहल होते पण ही कादंबरी वाचण्याचा योग मात्र लवकर येत नव्हता
आणि मग ही इच्छा पूर्ण केली माझ्या मोठ्या बंधू ने काम निमित्त तो नागपूर ला गेला असताना तेथून ही कादंबरी माझ्या साठी आणली आणि मग मी
वाचण्या साठी घेणार तर माझ्या परीक्षा जवळ आलेल्या मी ती ठेऊन दिली पण जेव्हा माझी परीक्षा संपली आणि मग त्याचा दुसऱ्या दिवशी
मी लगेचच ही कादंबरी वाचण्यास सुरवात केली ..

" कर्ण " अतिशय महान असे व्यक्तिमत्व

दानशूर
सुतपुत्र
सारथीपुत्र
कौन्तेय
राधेय
अंगराज

महान असे ते व्यक्तीमत्व कि ज्याच्या बद्दल कितीही बोलले तरीही कमी आहे
कै शिवाजी सावंत तुम्ही कर्णाला आपल्या कादंबरी मध्ये अतिशय सुरेख पणे उतरवले त्याच्या जीवनाचा एकून एक पाठ तुम्ही अतिशय
सुरेख पणे उतरवला जेव्हा ही कादंबरी मी वाचण्यास सुरवात केली तेव्हा वेळ कशी निघून जात होती हे मला पण समजले नव्हते

मैत्री
नाते संबंध
आईची माया
त्याने एकून एक पात्रला खरा न्याय दिला अश्या कर्णाला 
जेवढे बोलले तेवढे कमीच आहे

कै शिवाजी सावंत आपण आमच्या समोर सादर केलेल्या मृत्यंजय ला खूप खूप सलाम   

sweetsunita66

मी ही कादंबरी १ २ वर्षाची असतांना वाचली ,आता फारशी आठवत नाही ,पण कर्णाचा दानशूर पणा आठवतोय, जेव्हा त्याला कवच कुंडले दानात मागितली जाते ,हे वर्णन अतिशय मार्मिक लिहिलंय कादंबरीत ,मी आत्ता हि कादंबरी पुण्याला शॉप मध्ये शोधली पण जुनी आवृत्ती मिळाली नाही