मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय !!!!

Started by Prasad.Patil01, March 20, 2014, 10:58:07 AM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

तुला पाहून भान हरवले,
हृदयामध्ये काही घडले,
काही मज ते कसे न कळले,
हळूच मग मन बडबडले...

काय ??

पुन्हा प्रेम कळ्यांना फुलवावस वाटतंय,
मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय.

नाव तुझं ठाऊक नाही,
पत्त्याचा तर पत्ताच नाही,
तरी मला तुझ्याशी बोलावस वाटतंय.
मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय.

पाहून तुझ्या या ग अदा,
झालो मी वेडापिसा,
काळजात तुझं नाव कोरावस वाटतंय.
मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय.

इथे कोणी आपलं नाही,
जाणते मन बरच काही,
तरी हे परक आपलसं वाटतंय ,
मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय.

प्रेम म्हणजे चूक मोठी,
यात म्हणे घात होती,
आज मला हि चूक करावीशी वाटतेय.
मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय.

नसलो जरी मी एक कवी,
नसू दे जवळ लेखन वही,
तुझ्यावर चार ओळी लिहाव्याशा वाटतेय.
मला तुझ्या प्रेमामध्ये पडावस वाटतंय...
                         - प्रसाद पाटील