चिऊ ताई चिऊ ताई (बाल कविता)

Started by केदार मेहेंदळे, March 21, 2014, 10:23:53 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 चिऊ ताई चिऊ ताई
चोच तुझी इवली
दिवसभर करून चिव चिव
कशी नाही दुखली?

चिऊ ताई चिऊ ताई
रोज उठता लौकर
झाडावर बसून सकाळी
घालता कसला गोंधळ?

चिऊ ताई चिऊ ताई
कसली तुला घाई
काच असते बंद तुला
दिसत कशी नाही?

चिऊ ताई चिऊ ताई
बसा शांत बाई
वाटीत ठेवलय पाणी ते
पीत का नाही?

चिऊ ताई चिऊ ताई
सांग तरी जराशी
पोळी घेऊन जातेस ती
खातेस तरी कशाशी

चिऊ ताई चिऊ ताई
घरात येतेस बिंधास
घर मात्र बांधतेस का
फोटो मागे आडोशास?

चिऊ ताई चिऊ ताई
शाळा भरते काउचि
चिव चिव करता दिवसभर
शाळेत जाता कधी?

चिऊ ताई चिऊ ताई
खोड्या तुझ्या किती
अभ्यास नाही केलास तर
होशील मोठी कशी?

केदार...

आज विश्व चिमणी दिवस आहे. त्या बद्दल हि बाल कविता.

shashaank

अर्रे केदार - कसली मस्त आणि गोऽड कविता केली आहेस... बहोत खूब ....

Suresh ghate

लहान मुलांसाठी खूपच छान कविता आहे ही.

sweetsunita66

wa wa mast kavita aahe.balpanichya baryach chiu kauu chya kavita aathawalyat.......