एक एकला एकटाच.....(Love Story)

Started by Prasad.Patil01, March 21, 2014, 11:15:53 AM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

एक डोंगरी एक वृक्ष,
एक एकला एकटाच,
स्थितप्रध्य तो उभा तिथेचि,
ना सोबत ना साथ.

वर्षापाठ वर्ष उलटली,
दिवसांसवे पाने गळली,
तरी उभा तो तसा तिथेचि,
एकटाच.

नियतीने मग खेळ मांडला,
असा एक मग वसंत आला,
न्हाऊन गेला डोंगर सारा,
पावसात.

वृक्षासेजी अंकुर फुटले,
वेळी होऊन मग ते रुजले,
वृक्षाचे मन हि टिपले,
त्या वेलीने.

आता डोंगरी रंग पसरले,
दोघे हसले दोघे रुसले,
दोघांचेही मनही गुतले,
एकमेकांत.

काळाने मग डाव मोडला,
रवि हि मग तो असा तापला,
पालकच मारक ठरला,
त्या वेलीसाठी.

ताप तिला तो सह्य न झाला,
इवलासा मग जीव निघाला,
फक्त होती आस मनाला,
त्या वृक्षाची.

क्षणात सारे नाते तुटले,
हातामधले हातही सुटले,
पुन्हा मग ते तिथे उरले,
एकटेच....
               प्रसाद पाटील