वसंत वॆभव

Started by aap, March 21, 2014, 01:47:19 PM

Previous topic - Next topic

aap

वसंत वॆभव

नव चॆतन्याचा मास
नववर्ष चॆत्र मास

चॆत्रगॊर चॆत्रांगण
गुढीपाडवा हा सण         

वृक्षराजी पालवतात
लता मंडपी फुलतात

आम्रतरू फुलला मोहर
गंधित झाला परिसर

कोकिल मधुर स्वर कूजन
वसंत पंचमी होते पूजन

अंतराळीचे खग लाविती सप्तसूर
जणू सप्तर्षी अवतरले भूवर

उधळीत येतो वसंत वॆभव
आसमंतात तो मधुमास

सौ . अनिता फणसळकर