असावे ते

Started by hareshparab, March 21, 2014, 04:27:20 PM

Previous topic - Next topic

hareshparab

असावे  ते प्रेम कधी न संपणारे
नसावे ते कधी दुखा:चे क्षण
स्वप्न सारी पूर्ण व्हावीत तुझी
नसावी कोणतीही अडचण 

सुखाने  जावे भरून सारे
असावे हास्य नेहमी गालात तुझ्या
नसावे ते कधी हिरमुसलेले डोळे
असावे ते फक्त आनंदाश्रूनी भरलेले

संसार तुझा फुलून जावा आनंदान
असावे सौख्य नेहमी दारात तुझ्या
नसावी ती  वाकडी नझर कुणाची
असावे ते फक्त ऋणानुबंधाचे धागे

असावे आयुष्य स्वप्ना सारखे
मोग्र्याच्या फुलासारखे बहरलेले
इंद्रधनू परी रंगीबेरंगी
नभात अधंग पसरलेले