Facebookवरचं प्रेम.....

Started by Prasad.Patil01, March 22, 2014, 01:56:27 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

पहिल्याच प्रेमाची पहिलीच वेळ,
मनातील भावनांचा मांडलेला खेळ,
जुळवत होत मन मनाशी मेळ,
पहिल्यांदाच...

तुझा तो FBवरचा पहिला HI,
offline जाण न म्हणताच bye,
msgs राहायचे ते तुझे काय काय ??
आठवत मला सर्व ....

वाटत होत तुही माझ्यावर प्रेम करते,
माझ्याइतकी तूही माझ्यावर मरते,
म्हणूनच तू अशी रोज chat करते,
किती वेडा होतो न मी !!!

माझ्यासारखे बरेच आहे असं जेव्हा कळल,
मन माझं सखे ग फार फार रडलं,
माझ्याशीच हे का असं कस घडलं,
कळलच नाही !!!

अजूनही तू online असते,
नावापुढे तुझ्या तो Green डॉट दिसते   ,
msgs तुझ्यासाठी type च  असते ,
फक्त तुझ्याच साठी   !!!

फरक फक्त इतकाच आहे,
तुला send  मी ते करत नाही.
माझ्यामते याला अर्थ न राहला काही,
कारण आता तू आधी सारखी तीच नाही,
अन सखे तुझ्यासारखा मी मी मुळीच नाही....
                                - प्रसाद पाटील ( मी "मी" नाहीच )