मी एक प्रेमी वाटसरू......(Rose Day Spl)

Started by Prasad.Patil01, March 22, 2014, 11:11:49 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

मी एक प्रेमी वाटसरू,
विनवितो तुजला एक कळी,
येईल ती ग याच वाटी,
फुलशील का त्या वेळेवरी ??

ओठी हास्य नि मंद स्वरात,
विचारे मज ती एक कळी -
सजवेल का केसात तिच्या की
तुडविल मज ती पायदळी ??

मग मी म्हणालो :

खंत तुझी पटतीय मला पण,
आहे हि ना बात खरी !!
चंचल, सुंदर, गुणी, निरागस,
आहे ती अशी माझी परी...

नकोस करू तू द्वेष तिचा ग,
आहे ती नादान थोडी !!
तुझसम मलाही प्रेम करावं ,
इच्छा ही ग माझ्या मनी...

प्रेम हे माझं व्यर्थ ना जाईल,
याला उरला ना आता अर्थ जरी.
एकदिन कळेल प्रेम तिलाही,
आशा ही ग माझ्या उरी....
आशा ही ग माझ्या उरी....

                      - प्रसाद पाटील