घोलपांचे दुकान..

Started by विक्रांत, March 23, 2014, 02:50:27 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कुणाची तरी नजर लागली
घोलपांचे दुकान बंद पडले
घोलप म्हणाले ,
"मी काय कुणाचे घोडे मारले
सारे करतात तेच मी केले .
माल आणला ,माल विकला
कुठे पाव कुठे अर्धा ,
माल इकडे तिकडे गेला .
शंभर टक्के धंदा कुठला
सांगा प्रामाणिक असतो
चाणे कुजबळ गवार पाटी
आम्ही सारे हेच करतो
पुढचे दार बंद पडले
तरी काही हरकत नाही
मागच्या दारची वहिवाट
कुणी मोडू शकणार नाही
बरे वाईट दिवस तर
इथे साऱ्यांनाच येतात
मनमाडी डॉगाईत हे मित्र
ताठ मानेने मिरवतात
हिशोब थोडा चुकला खरा
पण आम्ही निर्दोष आहोत
नवे नवे होतो तेव्हा
आता एकदम पक्के आहोत
काही वर्ष वरवर टाळे
बहुदा तेही बसणार नाही
बसले जरी दुर्दैवाने
फार कमी होणार नाही
पण जो कुणी नडेल आम्हाला
कधी सोडणार नाही त्याला
आम्ही मानतो लोकशाहीला
हात  तिच्या ** ला !"

विक्रांत प्रभाकर