तुझ्या आसवांचे .....

Started by श्री. प्रकाश साळवी, March 23, 2014, 05:38:04 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तुझ्या आसवांचे ढिगारे वाहतो मी
तुझ्या मोकळ्या केसास "शहारे" आणितो मी

इथे वेदनांना बहर येती वंचनेचे
तुझ्या आठवणीना छळतो उगा मी,

हास्यात इथल्या सारेच मग्न झाले
रिकामेच प्याले उगा रीचवितो मी

"गझलेत" माझ्या मी किती सुन्न झालो,
इशारे तुझे यौवनांचे समजावतो मला मी,

इथे राज्य आहे, उमलत्या कळ्यांचे,
व्यर्थ सागराचे रक्त इथे फेसाळतो मी,

श्री प्रकाश साळवी दि. २३ मार्च २०१४