कधी लागेल गोडी तव नामाची!!

Started by श्री. प्रकाश साळवी, March 24, 2014, 12:36:11 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी


जाणिले जरी अशाश्वत विश्व सारे,
अशाश्वत ब्रम्हांड सारे,
तरीही ओढ ना घेई तव नामाची,
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

सारे सुखाचे सांगाती, दुखाःत ना साथ देती,
मायेचा पसारा, मायेत चिंब भिजवती,
तव नामात सुख मोठे आली त्याची प्रचीती,
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

ज्ञानेश-तुक्याने सांगितली याचीच महती,
गोरा-नाम्याने यानेच साधली प्रगती,
संत समागमानेच होईल नाहीशी अधोगती,
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

तव नामातच दंग होऊ दे - गुंग होऊ दे,
तन-मन माझे तुझेच नामी लागू दे,
नामातच रंगुनी जाऊ दे हीच विनंती
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

श्री प्रकाश साळवी दि २४ मार्च २०१४

vijaya kelkar

   आळविता आळविता
   अवचिता  ना कळता
   आला हा नकळविता
   दयाघना भगवंता ............................................