तिलाच विचारयाचे राहून गेले ..

Started by nphargude, March 25, 2014, 12:32:54 AM

Previous topic - Next topic

nphargude



तिने अर्धवट बोललेले शब्द सुद्धा पुष्कळ काही सांगून गेले ..

मनात असलेले समोर मांडताना थांबलेले क्षण बरेच काही बोलून गेले ..

का कळेना कसे हे प्रेमाचे धागे विणले गेले ..

आयुष्याचे माझ्या हे गणितच पार बदलून गेले ..

माझ्या हृदयाची तार छेडून तिने मधुर संगीत सुरु केले ..

पण कुठे थांबवायचे त्या संगीताला हेच कळायचे राहून गेले  ..

वाटले येईल ती सावरायला आणि सांभाळायला ..

पण हाय रे किस्मत या गडबडीत तिलाच विचारायचे राहून गेले ..  तिलाच विचारायचे राहून गेले ..