गोरा गोरा रंग तुझा

Started by विक्रांत, March 26, 2014, 10:24:13 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

गोरा गोरा रंग तुझा
उन्हामध्ये जाळू नको
उगाचच राणी अशी
रानोमाळी हिंडू नको

अनवाणी पाय तुझे
तापलेल्या भूमीवरी
पाहुनिया बसतात
चटकेच माझ्या उरी

फुलूनिया आले झाड
मोहरांनी गंध धुंद
झाडाखाली थांब जरा
विझू दे ग सारे अंग

जरा जरा वारा घे ग
अंगावरी पदरानी
तापलेले श्वास तुझे
निवो मंद झुळुकांनी

काय तुला सांगू आणि
काय करू कळेनाचि
तुझ्यासाठी करतो मी   
पायवाट काळजाची
 
विक्रांत प्रभाकर


dipak chandane

Vikrantji aapali kavita mala khup aavdali .............lai bhariiiiiiii.................Very Very Nice........Jar Vel milala tar mazi "Shbd yetat tevhna" Motivational Kvita Topic la Page 3 aahe mala kavita Shikaychi aahe margdarshan kara Pls........

विक्रांत

Thanks Nikhil & Dipak ,फार वर्ष पूर्वी कुसुमाग्रजांना पत्र लिहिली होती त्यात हाच प्रश्न विचारला होता .त्यांनी दिलेले उत्तर देतो .खूप कविता वाचा ,नवकविता लिहायच्या अगोदर छंद ,वृत्त ही अभ्यासा .अलीकडे कविता मुख्यत: मुक्त छंदात लिहिली जाते .तरीही नव्या जुन्या मोठ्या कवींच्या कविता वाचा .