तिथे चंद्र आणि इथे मी...

Started by Prasad.Patil01, March 27, 2014, 02:01:10 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

जरी असले हसरे चेहरे,
तरी दु:ख लपवतो मनी,
फार एकाकी जगतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

असतील लाखो चांदण्या,
या मन भुलवाया परी,
तरी एकटा जगतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

नको मज लाखो एक पाहिजे,
जी प्रेम खरे मज करी !!
अशी एक चांदणी शोधतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

दिसतील पास न असता साथ,
तरी आस हि आहे मनी,
म्हणूनच राती भटकतो आहे.
मज भेटेल कधीतर कुणी...
तिथे चंद्र आणि इथे मी...
तिथे चंद्र आणि इथे मी...

                      - प्रसाद पाटील