ऐसे झाले भोंदू...!

Started by श्री. प्रकाश साळवी, March 29, 2014, 12:05:28 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

:D ऐसे झाले भोंदू...!      ऐसे झाले भोंदू...!       ऐसे झाले भोंदू...!     ऐसे झाले भोंदू...! :D

शब्दास त्यांच्या त्यांनी जपलेच होते,
मैफलीतले त्यांचे गाणे "विरक्तीचे" च होते,

थोडी उभारी त्यांच्या शब्दास होती,
सभेतलेच त्यांचे भाषण "भगवे" च होते,

मी उगा का मारू फालतू बढाया,
बोलतानाच त्यांचे अवसान गळालेच होते,

अंगावरील शुभ्र वसने त्यांची "उसनिच" होती,
डोळ्यातच त्यांच्या "अंगार" च फुलले होते,

चालून चालले तरी थकले न त्यांचे किनारे,
आशिर्वाद त्यांचे सारेच घेत होते,

हाती ना त्यांच्या जरी तलवार होती,
मनाच्या दारात ते मुडदे पाडीतच होते,

जरी होत्या त्यांच्या गळ्यात रुद्र माळा
शब्दातच त्यांच्या "विखार" च होते,

श्री प्रकाश साळवी दि. २९ मार्च २०१४.