काय म्हणावं काळजाला

Started by SANJAY M NIKUMBH, March 29, 2014, 09:43:21 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

काय म्हणावं काळजाला
================
मी गुंतत चाललोय
हे मनालाही कळले नाही
म्हणून काळजाला तुझ्याशिवाय
दुसरे काही सुचत नाही

मीच विचारतो काळजाला
तुला दुसरा कामधंदा नाही
तिच्यासोबत रहाण्याचे सुख
म्हणते तुला कळणार नाही

नको करूस इतके प्रेम
तुला काही मिळणार नाही
अजून काही मिळण्याची
म्हणे आस राहिली नाही

तिच्यामुळे प्रेम कळलं
एवढसं कां कमी नाही
आता तिच्याशिवाय मी
श्वासही घेणार नाही

काय करावं काळजाचं
मला काही कळत नाही
मलाच विसरून गेलंय
बाकी काही दुःख नाही
===============
संजय एम निकुंभ , वसई
दि. २९.३.१४ वेळ : ७ . १५ स.