खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 30, 2014, 01:35:56 PM

Previous topic - Next topic
खरचं प्रेम करतेस का माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???

रोज काँलजेला जाताना,
नजरेला नजर देतेस,
मी डोळेभरुन पाहीलं की,
नजर चोरत असतेस.....

मी काही विचारलं की,
अबोला धरुन बसतेस,
मी जातो म्हटलो की,
थांब ना जरा म्हणतेस.....

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???

रोज येता जाता वाटेवर,
मला मध्येच अडवतेस,
तुझ्याशी काही बोलयचयं म्हणत,
बोलताना मध्येच अडखळतेस.....

मी बोलायला लागलो की,
तू फक्त माझ्याकडे पाहतेस,
किती छान बोलतोस रे तू,
म्हणुन माझं कौतुक करतेस.....

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???

काँलेजची सुट्टी झाली की, गेटवर
माझी वाट पाहत थांबतेस,
मी येताना दिसलो की,
नजर दुसरीकडे वळवतेस.....

मी जवळ आलो की,
जणू मुकीच होऊन जातेस,
माझ्याशी बोलायच असतानाही,
मुद्दाम गप्प गप्प राहतेस.....

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???

मी फोन केला की,
नंतर बोलू आपण सांगतेस,
अन् थोड्या वेळातच Call करुन,
खुप काही बडबडतेस.....

मी फोन ठेवतो म्हटलो की,
नकट्या रागाने Bye बोलतेस,
प्लीज माझ्या बोल ना थोडं,
म्हणुन तगादा लावतेस.....

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???

नेहमी माझ्या अवती भोवती,
नको तेव्हा फिरकतेस,
माझ्याशी बोलण्यासाठी,
नको ते कारण शोधतेस.....

मी खुप रागावलो की,
डोळ्यात आश्रूं आणतेस,
मी Sorry म्हटलो की,
It's Ok रे होतं असं म्हणतेस.....

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)
स्वलिखित -
दिनांक २९/०३/२०१४...
सकाळी ०९:३२...
©सुरेश सोनावणे.....