मित्राला श्रद्धांजली

Started by विक्रांत, March 30, 2014, 11:17:32 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

काल माझ्या या वर्गमित्राचे अपघाती निधन झाले .त्यानंतर जन्मलेली कविता ,त्याला श्रद्धांजली .

डॉ तुषार मोरे ,
एक सिग्नल चुकला असता
वा एक सिग्नल लागला असता
तर कदाचित तू वाचला असता
कदाचित
तू तो रस्ता धरला नसता
वा त्या ट्रीपला निघाला नसता
तर अपघात झाला नसता ...
असे आम्हाला उगाच वाटते
खरतर घडल्यावर घटना
जरतरला मोल नसते
जीवन काय आणि मृत्यू काय
सारीच इथे अपघातांनची
अटळ मालिका असते
गुलाबांच्या पाकळ्यातील सुगंधात 
दलदलीतील कचऱ्याच्या दुर्गंधात
जीवनाचे चक्र फिरत राहते 
पण टपोरे जीवनरसाने
काठोकाठ भरलेले फुल
जेव्हा अकाली गळून पडते
कुठल्यातरी आघाताने ,अपघाताने
तेव्हा मन हळहळते .
न भरणारा व्रण घेवून
झाड जगत राहते

विक्रांत प्रभाकर

dipak chandane

विक्रांत  आयुष्य हे असेच असते ..........
आपल्या मित्राला श्रद्धांजली अर्पित करतो .............

पण मित्रा माझा भाऊ अपघातात निधन पावला मागच्या वर्षी ...........तेंव्हा त्या दुख:त मी या ओळी लिहिल्या आहेत.....त्या आशा .....

पापण्यांमध्ये देऊनी गेलास प्रश्न सारे अश्रुंचे,
उत्तरेही तिथच होती उत्तरेही अश्रूच ते....................
                                                          - दि.मा.चांदणे

विक्रांत

dipak thanks for sharing your feelings ,Its very hard to forget beloved one .I can feel your pain your lines .