मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय!!!!!

Started by Suresh Jambhalkar, March 31, 2014, 10:58:50 AM

Previous topic - Next topic

Suresh Jambhalkar

मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय
तिच्यासोबात्चा  प्रत्येक  क्षण  पुन्हा  एकदा  अनुभवायचाय ,
माझं आयुष्य  मला  पुन्हा  एकदा  जगायचंय,
मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय

तिला  त्रास  देणारी  तिची  लट हळूच  बाजूला  साराय्चीये,
लाजून  खाली  गेलेली  तिची  मान, अलगद  हातात  घ्यायचीये

डोळ्यांमध्ये  साचलेल्या  तिच्या  अश्रूंची  वाट  बनायचय,
त्या  मोत्यांना  साठवून  घेणारी  ओंजळ  मला  व्हायचय ,
सुटला  होता  ज्या  रस्त्यावर  तिचा  हाथ,
त्याचं वाटेवरून  पुन्हा  हातात  हात  घालून  चालायचय
मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय
तिच्या  कुशीत  बसून  मला  खूप  खूप  रडायचंय  ,
माझ्या  केसांमधून  हात  फिरवताना  मला  तिला  पहायचंय 

आयुष्यभर  मला  तिच्यासोबत  राहायचंय  ,
तिला  दिलेला  प्रत्येक  वचन मला  निभवायचंय 
तिच्या  प्रेमळ  वर्षावात  मला  चिंब  भिजायचंय ,
इंद्रधनुष्यासारखा तिचं आणि  माझं आयुष्य  मला  सजवायचंय 
मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय

गवताच्या पात्यावरचा  प्रत्येक  थेंब  मला  टिपायचाय ,
त्या  टिपलेल्या  प्रत्येक  थेंबाचा  प्रेमळ  समुद्र  मला करायचाय 
तिच्या  मिठीमध्ये  मला  माझं  आयुष्य  जगायचंय ,
तिच्या  त्या  स्पर्शामधेच  मला  माझं  सुख  शोधायचंय
मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय

~सुरेश जांभळकर (चिंटू )