सावली ची काहुरी...

Started by vishakha beke, April 01, 2014, 12:45:50 AM

Previous topic - Next topic

vishakha beke

सावली ची काहुरी

एके दिवशी अशीच मी
बसले होते झोक्या वरती
ऊन जाउन सावली आली
वार्या वरती झुलू लागली

झुलता झुलता मोठी झाली
बघता बघता नभी विस्तारली
ऊन वार्याला झिडकारू लागली
ढगांना ही ढकलू लागली

तेवढ्यात एक वीज आली
रागारागाने जोरात कडाडली
मग , ढगांमध्ये ही हिम्मत आली
जोरदार पाण्याची धार लावली

बघता बघता सावली गेली
उन्हाची किरणे धर्तीवर आली
मात्र .... जात जाता ती एक म्हणाली ...
" तुमच्या साठी होते मी , माझ्यासाठी कोणीच नाही
झाडे झुडपे कापूनही, सावली मात्र तुम्हास हवी
जेंव्हा ... देण्यास छाया तुम्हा , पसरते नभी मी
तरी वर तुम्हीच म्हणता का आली अवकाळी ही ..."

विचार करावा आता आपण ही
झाडे वाढवू ह्या धरती वरती
नाहीतर ही अवकाळी छाया ही
लुप्त होईल कुठेतरी ... 

vishakha beke

kaahi suggestions astil tar jarur sangaa...  m waiting

Pranit Dinesh Mahadik

सागराच्या तळाशी अनेक शिँपले असतात,
पण...
त्यातल्या एखाद्याच शिँपल्यात
मौल्यवान रत्न मिँळतं..
आपल्या आयुष्यातही तेच घडतं...
मित्र व मैत्रिणि अनेक लाभतात,
पण...
मनाच्या शिँपल्यात आठवण बनुन कायमचे
राहणारे त्यापैकी,
काहीच तुमच्यासारखे असतात, जे
काळजात घर करुन राहातात..!
Pranit Mahadik.....