"प्रिये ती अंधारलेली रात्र"....

Started by Lyrics Swapnil Chatge, April 03, 2014, 09:41:51 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

प्रिये ती अंधारलेली रात,
होता हातात तुझा हात...
अन् सनाट वाटेवरती,
मिळाली झुळकेची साथ...

नभात होते ढग दाटलेले,
हवेत पसरले बेधुंद वारे
जुळताच नयनाशी बंध तुझ्या,
हरवले मन माझे सारे..

तुझ्या चेह-यावरती येणा-या केसांना,
सावरत होतीस तू पुन्‍हा पुन्‍हा
अन् खुप सुंदर वाटायची मला,
सावरताना त्‍या केसाना तू क्षणाक्षणा...

तीही काही बोलत नव्‍हती,
व मीही काही बोलत नव्‍हतो...
दोघेही फक्‍त होतो चालत,
अन् एकटेपण होते आमचे बोलत....
--------------- --------------
—★ *´¨
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Lyrics Swapnil Chatge

काळ्या मातीत पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा गंध...
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग....

--------------- ---------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★