भातुकलीचा खेळ नाही...

Started by Ankush S. Navghare, Palghar, April 05, 2014, 10:14:07 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तू एक विसरतेस
तू एकटी नाहीस
कोणाच्यातरी हृदयातली
तू देवता आहेस
तुझी फ़क्त एक चुक
तुला महाग होइल
पोपटवाल्या राक्षसा सारखी
तुझी गत होइल
विश्वास मिळविने सोपे
टिकविणे महा कठिन
एकदा तुटलेला आरसा
पुन्हा जुळणे कठीण
एकदा तुटला विश्वास
परत होणे नाही
जीवनभरासाठीच ही
तुला शिक्षा राही
गोष्ट काही करताना
दहादा विचार करावा
लग्न म्हणजे काही
भातुकलीचा खेळ नाही...
भातुकलीचा खेळ नाही...

... Ankush Navghare.©
03/04/2014