माझ्या स्वप्नातील ती!!!!!

Started by vidyakalp, April 06, 2014, 01:48:18 PM

Previous topic - Next topic

vidyakalp

माझ्या स्वप्नातील ती!!!!!

तीच्या डोळ्यांत एक तेज असावा
तीने पाहताच माझा बर्फ व्हावा
थंडगार पडलेल्या देहाला तीचा स्पर्श व्हावा
तीचा स्पर्श होताच देह पाण्यासारखा विरघळावा
असा माझ्या जीवनाला तीचा स्पर्श असावा

ती समोर येताच सर्वत्र अंधार पसरावा
त्या अंधारातसुद्धा मला तीचा चेहरा दिसावा
तीला पाहताच मला विश्वाचा विसर पडावा
असा माझ्या जीवनाला तीचा स्पर्श असावा

तीला सदैव माझा ध्यास असावा
ती माझे विश्व आणि मी तीचा संसार असावा
तीच्या माझ्यामधे कधीच दुरावा नसावा
तीच्या डोळ्यात मी आणि माझ्या डोळ्यात ती
असाच आमचा दृष्टीकोण असावा
असा माझ्या जीवनाला तीचा स्पर्श असावा

शेवटच्या अंतापर्यंत एकमेकांचा आधार असावा
दोघांचा श्वास मात्र एकाच वेळी संपवा
कारण नंतर कुणी एकटा नसावा
उगाच एकांताचा कुणाला दंड नसावा
असा माझ्या जीवनाला तीचा स्पर्श असावा


$ Vidyakalp $