हरवली माझी वाट..

Started by Tejas khachane, April 07, 2014, 06:04:58 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

तुझ्या श्‍वासात गुंफताना,
हरवलो होतो मी स्‍वताला...
तुझ्या मोहात पार डुबलो,
अनं सावरु कसं मनाला...
माझ्या या आसवांना,
पुसणारं नाही कोणी...
मग पुन्‍हा का सतावतात,
ह्या तुझ्या आठवणी...
का कळेना, मला पुन्‍हा,
का हरवली माझी वाट......
सागराच्‍या या किनारी,
लागे एकटेपणाची चाहुल...
वाटे माझ्या मनाला,
का पडले प्रेमात पाऊल...
का कळेना, मला पुन्‍हा,
का हरवली माझी वाट...
माझ्या या स्‍वप्‍नांना,
कधी पंख फुटणार नाही...
नको सोडून जाऊ मला,
माझ्या या पोरक्‍या पणी
का कळेना, मला पुन्‍हा,
का हरवली माझी वाट..


Tejas.................