हा आशिक तुझा !!

Started by Prasad.Patil01, April 11, 2014, 01:21:58 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

तू आहेस हसरी,
आहे थोडीसी लाजरी,
फुलबागी उडणारी,
जस फुलपाखरू !!

सखे पहिलीच वेळ,
तुझ्या नजरेचा खेळ,
गेला करून घायाळ,
मला पहिल्यांदाच !!

रोज शोधतो बाहाणे,
कसे होईल बोलणे,
तुझ्यावाचून साजणे,
आता करमत नाही !!

आता व्यर्थ वाटे सारे,
तुझ्यावाचून नजरे,
होती हीच हवी का रे ??
बोले मन माझं !!

जीव घाबरतो फार,
होईल मी ग तारातार,
नको सोडू अर्ध्यावर,
मला कधी राणी माझे !!

कर थोडा तू विचार,
साथ हवी जन्मभर,
तुला प्रेम निरंतर,
करील आशिक तुझा !!
हा आशिक तुझा  !!

           - प्रसाद पाटील