राजकारण

Started by geeta gosavi, April 11, 2014, 06:54:40 PM

Previous topic - Next topic

geeta gosavi



राजकारण राजकारण
आहे का हे जनतेच्या
कल्याणाचे कारण ?

इथे असते फक्त
मंत्र्या -मंत्र्यांची झोंबी,
मिळावी खुर्ची म्हणून
करतात सर्वत्र बोंबाबोबी

किती असतात हे मंत्री
भाषणाच्या उत्साहात,
दाखवतात त्यांची आणीबाणी
शब्दांच्या वारात

लावतात शेजारी- शेजारी
विरुद्ध पक्षांच्या मंत्र्यांचे चित्र,
पाहून वाटेल ते आपल्याला
हे आहेत एकमेकांचे मित्र

लागलेली असते त्यांना
फक्त खुर्चीची चाहूल,
म्हणून इकडे-तिकडे  भरकटत
असतात त्यांचे पाऊल

जिथे कधीही भरकटत
नाही कुत्री,
निवडणूकीच्यावेळी तिथेही
येतात मंत्री

अन्न वस्त्र निवारा
या गोष्टींची दाखवतात हमी,
आणि जनतेचे मनही
फुलवून टाकतात आनंदमयी

मत दया, आम्हाला मत दया
अशी भिक मागत सुटतात मतांची,
कारण गरज असते त्यांना
जनतेच्या अंगठयाची

एका पाठोपाठ येतात सारे
निवडणूकीच्या वेळी,
झाली का ती एकदा
कोणीही येत नाही जनतेच्या संकटावेळी...

गीता गोसावी
geetagosavi.blogspot.com

guest

Kharach raajkaran vatratpanech wagatat :)

geeta gosavi

ho asach kahi tari wagat asatat ;)

मिलिंद कुंभारे

जिथे कधीही भरकटत
नाही कुत्री,
निवडणूकीच्यावेळी तिथेही
येतात मंत्री......... :D :D :D