दत्त माझा विटेवरी

Started by विक्रांत, April 12, 2014, 12:08:18 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

दत्त माझा विटेवरी
विठू दिसे औदुंबरी
शंख चक्र गदापाणी
मिरवितो श्वान चारी

तया पाहू जाता तिथे
गोड सुटतसे कोडे
जनार्दन एकनाथ
मर्मबंध उलगडे

नाथ पंथी मुळपीठ
वाळवंटी विरूढले
गिरनार ब्रह्मगिरी
भागवती फोफावले

अहो स्वामी देवराया
कुठे कुठे देऊ खेव
माझे मनी ज्ञानदेव
माझे मनी सायंदेव

विक्रांत प्रभाकर